चांद , मी ...अन् विसावा😃
आज बऱ्याच दिवसांनी मी गच्चीवर गेले. रात्रीची वेळ होती . नुकतीच कोजागिरी पौर्णिमा होऊन गेली होती आणि चंद्राच्या लोभस रूपाने मनाला साद घातली. किती सुंदर दिसत होता चंद्र . काळ्याभोर आकाशात चंद्र अधिकच खुलून दिसत होता . चंद्राचा मंद प्रकाश मनाला एक वेगळीच ऊर्जा देत होता अस वाटत होत की घरात जाऊच नये. मला अस वाटतं की कधीतरी हा एकांत हवा जो मनाला नवचैतन्य देईल.आपण नेहमीच माणसाच्या संपर्कात असतो . विचाराची देवाण घेवाण तर चालूच असते . कोणीतरी आपल्याशी संवाद साधत असतो तेव्हा दररोजच्या या जीवनात असे वाटत असते की आपल्यावर विचारांचा अक्षरशः भडीमार होतो . तेव्हा अस वाटते की विसावा हा हवा . विसावा हा हवा , जीवनप्रवाहाला तनमन हरपून विचार हा जोपासावा जगावे जीवनी हरपून भान घ्यावा कानोसा अंतरंगी डोकावून फेऱ्या मारत असताना सहज लक्ष गेले .मागे नारळाची झाड होती आणि त्यांच्या फाद्यांवर चंद्राचा मंद प्रकाश पडला होता . रस्त्यावरील खंब्यावरच्या लाईटचा प्रकाश गच्चीवर पडला होता आणि भिंतीवर माझी सावली दिसत होती. अस वाटत होत की कॉलेज मध्य...