झेप🙂💯
संपले आता जरी सर्व काही
उभी राहते तरी मी खरी
बंद डोळे ,अबोल मन जरी
दाटलेले अश्रू डोळ्यातून ओघळता खाली
भरभक्कम शरीराची जरी दिसते सावली
आता असलेले रक्त मारत असते उसळी
उसळलेले मन घेत असते उंच भरारी
स्वप्नांना जाग करण्याची खूणगाठ बांधते मनाशी
आसुसलेल्या जीवाची काहुर उठते मनी
झेप घेत स्वप्नांना बांधावे पाठीशी
उधळीत बंध जुलमी विचाराचे, नाते हे बंधनाचे
मन जरी अंतःकरणाचे, विचार जणू पाषाण हृदयाचे
डोळे झाकता अबोल मी, शांत होते जरी
आयुष्याची ही घुसमट संपत नाही खरी
मी अनेकदा हरवून जाते सभोवताली जरी
तरी अनेकदा मी आतून एकटी पडते खरी
कविता जरी माझी तरी कहाणी प्रत्येकाची
मृगजळ जरी वाटते तरी वास्तविकता आपल्या सगळ्यांची
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा