पोस्ट्स

जरा मानसशास्त्र कडे...

  लिहिताना,वाचताना,जगताना,बोलताना मला जीवन हा शब्द खरंच खूप अनमोल वाटतो. गंमत म्हणजे जीवनाचे वेगवेगळे टप्पे माणूस त्याच्या आयुष्यात जगातअसतो. व्यक्ती तितक्या प्रवत्ती म्हणता ते अगदी खर आहे ! लहानपणी एक काळ असतो जिथे तो प्रचंड गुणी असतो. सभोवतालच जग जस भासत तसा तो विचार करायला लागतो.त्याला कारणही तशीच असता, तेच लहानपणीचे विचार जे आईवडील नेहमी त्याच्या कानावर घालत असता अन् त्याचप्रमाणे त्याचीदेखील जीवन पद्धती घडत जाते. काही जण मनाने हळवे तर काहीजण कठोर असता. लहानपणी अनेक वेळा आईवडील रागवता ,वाईट बोलता अश्यावेळी मात्र त्याचे मन दुखवते आणि विचार करायला लागते खरंच आपण इतके वाईट आहोत का ?बराचवेळ काही चुकले तर आई बोलते तू नालायक आहे अश्या वेळी मुल विचार करायला लागत खरंच आपण किती मंद आहोत बरीच कामे आपल्याला जमत नाहीत.आई बोलते तसा आपला लहान भाऊ किती हुशार! आपणच असे कसे ? अस एकदा नाही अनेकदा घडत जातं याने मुल केवळ कमजोरच नाहीतर निराश होत जाता. प्रत्येकवेळी आईवडिलांचा हेतू वाईटच असतो असे तर नसते पण प्रत्येक मुल हे खमकेच असता अस पण नाही ना..याचा विचार जरूर व्हायला हवा. मुलांना ओळखू...

बर्म्युडा ट्रँगल ..... रहस्य

 रहस्यमयी अश्या अनेक गोष्टी जगात घडत असतात. आपण त्याबद्दल ऐकतो , विचार करतो तेव्हा आपल्याला ही हे अद्भुत चमत्कार भारावून सोडता. सहज पेपर वाचत असताना मी ही बर्म्युडा ट्रँगल विषयी वाचले . विज्ञानात गोडी असणाऱ्यांच्या मनाला हे विषयी सहज स्पर्श करता आणि त्यातील रहस्याकडे सहज खेचले जातात .अमेरिकेच्या आग्नेय दिशेला  हा भाग येतो. तीन काल्पनिक रेषांनी तयार झालेला हा प्रदेश त्रिकोनारुप दिसतो त्यामुळे याला बर्म्युडा ट्रँगल बोलले जाते. अथांग सागरात बुडालेला हा प्रदेश वरवर मानवी मनात कुतूहल निर्माण करतो . अमेरिकाचा बेलगाम वावर असलेल्या य भागात दुसऱ्या महायुध्दाच्या दरम्यान पाच विमान  लापता झाली आणि  त्यानंतर याबतीत शोध घेण्यात आला पण विमानाचे साधे अवशेष ही या भागात मिळाली नाही. त्यांना शोधण्यास गेलेल्या दोन विमानाचा देखील संपर्क तुटला आणि  ती देखील बेपत्ता झाली . त्यामुळे नाविक दल सावध होऊन  त्याभागात जहाज  नेण्याची मोहित रद्द करण्यात आली तसेच याप्रदेशात कोणी  जहाज व विमाने नेऊ नये असे फर्मान काढले पण इतर देश तेवढी खबरदारी घेत नव्हते.   कोणती ही साव...

चांद , मी ...अन् विसावा😃

 आज बऱ्याच दिवसांनी मी गच्चीवर गेले. रात्रीची वेळ होती . नुकतीच कोजागिरी पौर्णिमा होऊन गेली होती आणि चंद्राच्या लोभस रूपाने मनाला साद घातली. किती सुंदर दिसत होता चंद्र . काळ्याभोर आकाशात  चंद्र अधिकच खुलून दिसत होता . चंद्राचा मंद प्रकाश मनाला एक वेगळीच ऊर्जा देत होता अस वाटत होत की घरात जाऊच नये. मला अस वाटतं की कधीतरी हा एकांत हवा जो मनाला नवचैतन्य देईल.आपण नेहमीच माणसाच्या  संपर्कात असतो . विचाराची देवाण घेवाण तर चालूच असते . कोणीतरी आपल्याशी संवाद साधत असतो तेव्हा दररोजच्या या जीवनात असे वाटत असते की  आपल्यावर विचारांचा अक्षरशः भडीमार होतो . तेव्हा अस वाटते की विसावा हा हवा .     विसावा हा हवा , जीवनप्रवाहाला     तनमन हरपून विचार हा जोपासावा     जगावे जीवनी हरपून भान    घ्यावा कानोसा अंतरंगी डोकावून फेऱ्या मारत असताना सहज लक्ष गेले .मागे नारळाची झाड होती आणि त्यांच्या फाद्यांवर चंद्राचा मंद प्रकाश पडला होता . रस्त्यावरील खंब्यावरच्या लाईटचा प्रकाश गच्चीवर पडला होता आणि भिंतीवर माझी सावली दिसत होती. अस वाटत होत की कॉलेज मध्य...

झेप🙂💯

 संपले आता जरी सर्व काही उभी राहते तरी मी खरी बंद डोळे ,अबोल मन जरी दाटलेले अश्रू डोळ्यातून  ओघळता खाली भरभक्कम शरीराची जरी दिसते सावली आता असलेले रक्त  मारत असते उसळी उसळलेले मन घेत असते उंच भरारी स्वप्नांना जाग करण्याची खूणगाठ बांधते मनाशी आसुसलेल्या जीवाची काहुर उठते मनी झेप घेत स्वप्नांना बांधावे पाठीशी उधळीत बंध  जुलमी विचाराचे, नाते हे बंधनाचे मन जरी अंतःकरणाचे, विचार जणू पाषाण हृदयाचे डोळे झाकता अबोल मी, शांत होते जरी आयुष्याची ही घुसमट संपत नाही खरी मी अनेकदा हरवून जाते सभोवताली जरी तरी अनेकदा मी आतून एकटी पडते खरी कविता जरी माझी तरी कहाणी प्रत्येकाची मृगजळ जरी वाटते तरी वास्तविकता आपल्या सगळ्यांची