चांद , मी ...अन् विसावा😃

 आज बऱ्याच दिवसांनी मी गच्चीवर गेले. रात्रीची वेळ होती . नुकतीच कोजागिरी पौर्णिमा होऊन गेली होती आणि चंद्राच्या लोभस रूपाने मनाला साद घातली. किती सुंदर दिसत होता चंद्र . काळ्याभोर आकाशात  चंद्र अधिकच खुलून दिसत होता . चंद्राचा मंद प्रकाश मनाला एक वेगळीच ऊर्जा देत होता अस वाटत होत की घरात जाऊच नये. मला अस वाटतं की कधीतरी हा एकांत हवा जो मनाला नवचैतन्य देईल.आपण नेहमीच माणसाच्या  संपर्कात असतो . विचाराची देवाण घेवाण तर चालूच असते . कोणीतरी आपल्याशी संवाद साधत असतो तेव्हा दररोजच्या या जीवनात असे वाटत असते की  आपल्यावर विचारांचा अक्षरशः भडीमार होतो . तेव्हा अस वाटते की विसावा हा हवा .

    विसावा हा हवा , जीवनप्रवाहाला

    तनमन हरपून विचार हा जोपासावा

    जगावे जीवनी हरपून भान

   घ्यावा कानोसा अंतरंगी डोकावून

फेऱ्या मारत असताना सहज लक्ष गेले .मागे नारळाची झाड होती आणि त्यांच्या फाद्यांवर चंद्राचा मंद प्रकाश पडला होता . रस्त्यावरील खंब्यावरच्या लाईटचा प्रकाश गच्चीवर पडला होता आणि भिंतीवर माझी सावली दिसत होती. अस वाटत होत की कॉलेज मध्ये कार्यक्रमात जो फोकस लावलेला असतो अगदी तस् दिसत होत. सगळीकडे निरव शांतता होती. आणि मी रेडिओ वर गाणे ऐकत फेऱ्या मारत होत्या. मी मात्र एक वेगळीच शांतता अनुभवत होते . मी एकटी होते तरीपण मन शांत होते . रिक्त आभाळाकडे बघत अस वाटत होते की आपण ही  कधीतरी रिक्त असावं . कोणी नसावं आपल्यासोबत अगदी रिक्त असावं आपल मन. कोणतीही अपेक्षा नसावी जगाकडून . कोणतीही तक्रार नसावी स्वतः विषयी. आहेत त्यापेक्षा खूप आनंद निर्माण व्हावा मनात. निखळ हसत बोलावं स्वतः शी . 

     आज बोलायला कोणी नाही , कोणी आपल्याला वेळ देत नाही अशी समस्या येते आपल्याला. एकटे असल्यास भीती वाटते. पण का वाटावं असं आपल्यात ही एक टीम आहेना जेव्हा एकटे असतो तेव्हा ती ऊर्जा देते. चांगले वाईट अनुभवाचं आकलन करायला शिकवते . त्यासाठी नेहमी वेगळा कोणी का हवा. इतकी सुंदर रचना आहे कधीतरी त्याचा अनुभव करू, कधी मनसोक्त गाणे ऐकू, कधी निसर्गाचा अनुभव करू, रात्रीच्या शांतीचा अनुभव करू. हे सगळ्याला कठीण वाटते पण हे ही आपल्याला एकटे जगायला शिकवेल, वेळ आली तर निभावून न्यायला शिकवेल. चंद्र आणि चांदण्या ज्यांच कौतुक वाटायचं आज पुन्हा ते अनभवू. बघू चंद्राने आजतरी आपली पाठ सोडली का 😃 चांदण्या पूर्वीसारख्या दिस ताय का त्यांचा प्रकाश कमी झालाय.एखादे गाणे आठवतंय का लहानपणीच?😂 मज्जा येते पण पुन्हा बालपणात जायला . कदाचित आपल काही राहून गेलंय याचीही जाणीव होईल पण या आठवणी जगण्यासाठी एक नवीन दिशा देतील.  एक क्षणिक विसावा भेटेल या जीवाला कोण जाणे पुन्हा ही गच्ची ची सफर ही अनुभवता येईल का नाही. याने आपण थोडेसे खंबीर होतोल.

टिप्पण्या