बर्म्युडा ट्रँगल ..... रहस्य

 रहस्यमयी अश्या अनेक गोष्टी जगात घडत असतात. आपण त्याबद्दल ऐकतो , विचार करतो तेव्हा आपल्याला ही हे अद्भुत चमत्कार भारावून सोडता. सहज पेपर वाचत असताना मी ही बर्म्युडा ट्रँगल विषयी वाचले . विज्ञानात गोडी असणाऱ्यांच्या मनाला हे विषयी सहज स्पर्श करता आणि त्यातील रहस्याकडे सहज खेचले जातात .अमेरिकेच्या आग्नेय दिशेला  हा भाग येतो. तीन काल्पनिक रेषांनी तयार झालेला हा प्रदेश त्रिकोनारुप दिसतो त्यामुळे याला बर्म्युडा ट्रँगल बोलले जाते. अथांग सागरात बुडालेला हा प्रदेश वरवर मानवी मनात कुतूहल निर्माण करतो . अमेरिकाचा बेलगाम वावर असलेल्या य भागात दुसऱ्या महायुध्दाच्या दरम्यान पाच विमान  लापता झाली आणि  त्यानंतर याबतीत शोध घेण्यात आला पण विमानाचे साधे अवशेष ही या भागात मिळाली नाही. त्यांना शोधण्यास गेलेल्या दोन विमानाचा देखील संपर्क तुटला आणि  ती देखील बेपत्ता झाली . त्यामुळे नाविक दल सावध होऊन  त्याभागात जहाज  नेण्याची मोहित रद्द करण्यात आली तसेच याप्रदेशात कोणी  जहाज व विमाने नेऊ नये असे फर्मान काढले पण इतर देश तेवढी खबरदारी घेत नव्हते.   कोणती ही सावधगिरी न बाळगता आपले विमान  त्यांनी या प्रदेशात पाठवले आणि हे विमान भरकटले. त्याच्या वैमानिकांनी संदेश पाठवला की खाली काही दिसत नाही. होकायंत्राचा काटा कसाही गरगर फिरतोय एवढं संदेश देऊन तेही लापता झाला. याचा शोध घेतल्यानंतर ही त्याचा काही  शोध लागला नाही ना त्याचे काही अवशेष सापडले. यांनतर या रहस्यमय जागेचा शोध घेण्यास गेलेल्यांना काहीसा अजब अनुभव आला , काही कसेबसे जीव वाचवण्यासाठी मागे फिरले. 

शास्त्रज्ञांनी याचा शोध लावण्याचा खूप प्रयास केला तेव्हा त्यांना असे वाटले की या भागात गुरुत्वाकर्षण शक्ती वेगळी असेल त्याचा विमानाच्या होकायंत्रावर परिणाम होऊन ते गरागरा फिरत असेल. इंधन संपल्यामुळे  विमान समुद्रात बुडत असतील पण त्याच्या अवशेषांचा शोध घेतल्यावर मात्र ती कुठे ही सापडत नाही यामुळे हे गूढ कायम आहे. सागराच्या तळाशी मोठी विवरे आणि दऱ्या आहेत त्यामुळे  जहाज बुडत असतील पण मग विमानाचं काय? हा ही प्रश्न पडतो.  इथे  मासेही उलट्या दिशेने पोहत सुमद्राकडे जातात , त्यांनाही दिशा कळत नाही तेही भरकटत जात आणि मृत्युमुखी पडता. आहे की नाही अजब नी गूढ.... आता यंत्रमानव सागराच्या तळाशी पाठवून त्यांच्याद्वारे  छायाचित्रे काढून  बर्म्युडा ट्रँगलचे गूढ शोधण्याच्या प्रयासात काही सागर पर्यटक आहेत पण त्यासाठी लागणारा खर्च कोटीच्या घरात आहे. अमेरिकन तज्ज्ञांच्या मते हा भाग उपयोगाचा नसल्याने उगीच खर्च करण्यात अर्थ नाही आणि त्याचा उपयोग इतर देशांनाच वाहतुकीसाठी जास्त होईल त्यामुळे  आपण त्या फंदात पडू नये.

आहे की नाही अद्भूत....


टिप्पण्या