जरा मानसशास्त्र कडे...
लिहिताना,वाचताना,जगताना,बोलताना मला जीवन हा शब्द खरंच खूप अनमोल वाटतो. गंमत म्हणजे जीवनाचे वेगवेगळे टप्पे माणूस त्याच्या आयुष्यात जगातअसतो. व्यक्ती तितक्या प्रवत्ती म्हणता ते अगदी खर आहे ! लहानपणी एक काळ असतो जिथे तो प्रचंड गुणी असतो. सभोवतालच जग जस भासत तसा तो विचार करायला लागतो.त्याला कारणही तशीच असता, तेच लहानपणीचे विचार जे आईवडील नेहमी त्याच्या कानावर घालत असता अन् त्याचप्रमाणे त्याचीदेखील जीवन पद्धती घडत जाते. काही जण मनाने हळवे तर काहीजण कठोर असता.
लहानपणी अनेक वेळा आईवडील रागवता ,वाईट बोलता अश्यावेळी मात्र त्याचे मन दुखवते आणि विचार करायला लागते खरंच आपण इतके वाईट आहोत का ?बराचवेळ काही चुकले तर आई बोलते तू नालायक आहे अश्या वेळी मुल विचार करायला लागत खरंच आपण किती मंद आहोत बरीच कामे आपल्याला जमत नाहीत.आई बोलते तसा आपला लहान भाऊ किती हुशार! आपणच असे कसे ? अस एकदा नाही अनेकदा घडत जातं याने मुल केवळ कमजोरच नाहीतर निराश होत जाता.
प्रत्येकवेळी आईवडिलांचा हेतू वाईटच असतो असे तर नसते पण प्रत्येक मुल हे खमकेच असता अस पण नाही ना..याचा विचार जरूर व्हायला हवा. मुलांना ओळखून त्याप्रमाणे वागणूक द्यायला हवी. याक्षणी मुलांपेक्षा पालकांनी याचा जास्त विचार करायला हवा कारण लहान मूल हे मातीच्या चिखलासारखी असता त्यांना जसा आकार देऊ तशी ती घडता.
काळाबरोबर मुल मोठी होता .आसपासच्या घटनेचा चांगला वाईट अर्थ लावायला शिकत असता. अशावेळी त्यांना त्यांचे निर्णय घेऊन द्याला हवे. त्यांना मार्गदर्शन जरूर करा पण निर्णय मात्र त्यांनाच घेऊन द्या. हे त्यांच्या आयुष्याचा मंत्र आहे आणि तो त्यांनाच वापरू द्या.
यानंतर मुल तारुण्यात येतं तेव्हा मात्र ते प्रगल्भ झालेले असता. असंख्य गोष्टी ते अभ्यासत असता . चांगले वाईट अंदाज बांधत असता. अश्यावेळी त्यांचे मित्र बना. ज्या मुलांना आईवडीलासारखे मित्र असतात ती आयुष्यात चांगलं नाही जमल तर वाईट पण काम कधी करत नाहीत. आपल्याला आपल्या वयाचेही मित्र हवेत. ही सर्व मंडळी आपल जीवन सुकर करता . आपल यश हे आपल्याला आनंद देईलच अस नाही पण आपल आनंदी असण हे आपल्याला यशाचा मार्ग नक्कीच दाखवेल.
असंख्य माणसे जेंव्हा आपण अनुभवतो तेव्हा आपणही त्यांना वेगवेगळ्या परिमाणात तोलतो.तेव्हा अस लक्षात येत की कोणीच परिपूर्ण नाही तेव्हा आपणही स्वतः ला कमी समजण्याची चूक करू नये. स्वतः वरही प्रेम करावं जे आपल्यासाठी नवसंजीवनी ठरू शकेल. स्थैर्य हा जीवनाचा पाया आहे. संयम आपल्याला स्थिर ठेवू शकेल . शांती हे ध्येय राहील तर आयुष्य बदलून जाईल आणि कदाचित जगण्याची भीतीच संपुष्टात येईल.
Nice
उत्तर द्याहटवा